स्थानिक गुन्हे शाखेची हरदडा फाट्याजवळ रेती तस्करी वाहनावर धाड. वाहनासह एकास अटक


  1. गुन्हे शाखेची अवैध पिवळी रेती तस्करीवर धाड,वाहानासह एकास घेतले ताब्यात
    ४.०५.०००/- रुपया मुद्देमाल जप्त.

मुख्य संपादक:-सागर पाईकराव.

उमरखेड हद्दीतील मौजा हरदडा फाटा रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध पिवळी रेती तस्करी करणाऱ्या वाहनावर कारवाई केल्याने रेती तस्कराचे धाबे दणानाले.
यवतमाळ जिल्ह्यात कोणात्याही प्रकारचे अवैध धंदे,अवैध शस्त्र,अवैध उत्खनन सुरु राहणार नाही.तसेच अवघड गुन्हे,आरोपी शोध,अवैध धंद्याचे समुळ उच्चाटण व्हावे याकरीता मा.पोलीस अधिक्षक कुमार चिंता साहेब यांनी पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना अदेशीत केले होते.त्याच अनुशंगाने पोलीस निरिक्षक स्थानीक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्यांचे अधिस्थान पथकांना गोपनीय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.
यावरून दिनांक २६/८/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागत ईद -ए – मिलाद बंदोबस्त तसेच अवघड गुन्हे,आरोपी शोध,कामी रवाना झाले.पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहीतीदारा कडून माहीती मिळाली की, उमरखेड ते ढाणकी रोडने डुग्गा (टिप्पर ) व्दारे अवैध बिनारॉयल्टी चोराटी पिवळी रेती वाहतूक होत आहे.अशी माहीती मिळाल्याने नमुद पोलीसाधीकारी व पोलीस आमलदार असे दोन पंचासह मिळालेल्या माहीती प्रमाणे हरदडा फाटा रस्त्यावर सापळा लावला असता एक डुग्गा विनापरवाना अवैध पिवळी रेती वाहतूक करून नेत असतांना मिळुन आल्याने डुग्गा (टिप्पर) क्रंमाक MH-04-EL- 5753 व त्यामधील पिवळी रेती असा एकुन ४.०५.००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून इसम नामे सय्यद शाहीद सय्यद वहीद वय २० वर्ष राहणार वार्ड क्रमांक १५ ढाणकी ता.उमरखेड जिल्हा यवतमाळ यास डुग्गा टिप्परसह ताब्यात घेवून त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे उमरखेड कलम ३०३ (२) भान्यास सह महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कालम ४८ (८ )अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक यवतमाळ कुमार चिंता(भा.पो.से.)साहेब,मा.अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ अशोक थोरात (म.पो.से.) सा.तसेच मा.पोलीस निरिक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ,यांचे मागदर्शनात स.पो.नि.धिरज बांडे,पोउपनि/अमोल राठोड सफौ/ मुन्ना आडे,सफौ/ संतोष भोरगे,पोहवा/ तेजाब रणखांब,पोहवा/सुभाष जाधव,पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा/ रमेश राठोड,पोशि/ सुनिल पंडागळे,चापोउपनि/रविंद्र शिरामे,चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.


3
कृपया वोट करा

MKM मराठी न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!