धनोडा येथे गुन्हे शाखेची अवैध देशी दारूवर धाड वाहनासह ६.२०.००० रुपयाचा मुद्देमाल जप्त, एकास अटक.


  1. धनोडा येथे गुन्हे शाखेची अवैध देशी दारूवर धाड, वाहानासह ६. २०.०००/- रुपया मुद्देमाल जप्त.मुख्य संपादक:-सागर पाईकराव.महागांव हद्दीतील मौजा धनोडा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर व इसमावर कारवाई करून ६,२०००० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.यवतमाळ जिल्ह्यात कोणात्याही प्रकारचे अवैध धंदे,अवैध शस्त्र,अवैध उत्खनन सुरु राहणार नाही. तसेच अवघड गुन्हे,आरोपी शोध,अवैध धंद्याचे समुळ उच्चाटण व्हावे याकरीता मा.पालीस अधिक्षक कुमार चिंता साहेब यांनी पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना अदेशीत केले होते.त्याच अनुशंगाने पोलीस निरिक्षक स्थानीक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्यांचे अधिस्थान पथकांना गोपनीय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.
    यावरून दिनांक २५/८/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागत ईद -ए – मिलाद बंदोबस्त तसेच अवघड गुन्हे,आरोपी शोध,कामी रवाना झाले.पोलीस स्टेशन महागांव हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहीतीदारा कडून माहीती मिळाली की,एक टाटा टियागो EV कंपनीच्या चारचाकी वाहानामध्ये इसम नामे मनोज परसराम कदम रा. महागांव हा अवैधरीत्या बिनापरवाना देशी दारु विक्री करीता घेवून जात असुन तो चारचाकी वाहनासह मौजे धनोडा येथिल जयस्वाल यांच्या दुकानासमोर थांबला आहे. अशी माहीती मिळाल्याने नमुद पोलीसाधीकारी व पोलीस आमलदार असे दोन पंचासह मिळालेल्या माहीती प्रमाणे धनोडा येथे रवाना होवून सापळा लावून एक टाटा टियागो EV चारचाकी वाहन क्रंमाक MH-29-CB-2623 वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये १० पोते त्यामध्ये देशी दारु बॉबी संत्रा प्रत्येकी पोत्यात तीन पेट्या याप्रमाणे एकुण तीस पेट्या प्रत्येक पेटीत ९० मी ली क्षमतेच्या १०० नग शिश्या प्रमाणे १० पोत्यात ३००० नग देशी दारू बॉबी,संत्राच्या शिश्या किमत १.२०.०००/- रुपये तसेच देशी दारू वाहतूक करीता वापरत असलेले चारचाकी वाहन असा एकुण ६. २०.०००/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करून नमुद इसम मनोज परसराम कदम वय ४० वर्ष राहणार गणपती चौक वार्ड क्रमांक १६ महागांव ता. महागांव जिल्हा यवतमाळ यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे महागांव येथे दारुबंदी कायदया अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
    सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक यवतमाळ कुमार चिंता(भा.पो.से.)साहेब,मा.अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ अशोक थोरात (म.पो.से.) सा.तसेच मा.पोलीस निरिक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ,यांचे मागदर्शनात स.पो.नि.धिरज बांडे,पोउपनि/अमोल राठोड सफौ/ मुन्ना आडे,सफौ/ संतोष भोरगे,पोहवा/ तेजाब रणखांब,पोहवा/सुभाष जाधव,पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा/ रमेश राठोड,पोशि/ सुनिल पंडागळे,चापोउपनि/रविंद्र शिरामे,चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.


1
कृपया वोट करा

MKM मराठी न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!