महागांव तहसील प्रवेशव्दारा जवळ घणकचऱ्याची सुटली दुर्गंधी.* *कचरा टाकणाऱ्यावर कारवाई कधी करणार*


प्रतिनिधी:- महागांव

महागांव मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशव्दारा बाजूस शहरास विद्युत पुरवठा करणाऱ्या दोन रोहित्र्या आहेत. दोन्हीच्या मध्यभागी लगतचे छोटो मोठे व्यापारी दरोज अवाढव्य कचरा टाकतात हा कचरा नगर पंचायत त्वरीत उचलत नसल्याने त्यांची दुर्गंधी सुटत आहे.तर तहसिल कार्यालया मध्ये येणाऱ्‍या अनेक नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास होत आहे.यातून येणाऱ्या जाणऱ्या नागरिकांच्या अरोग्यास धोका निर्माण होण्याचे चित्र दिसून येत आहे.

महागांव तहसिल प्रशासनाने व नगर पंचायतने प्रवेशव्दारा समोर घणकचरा टाकऱ्या व्यक्ती वर कठोर कार्यवाई करून कचरा टाकणे बंद करून जनतेच्या आरोग्यास होणारा धोका टाळावा अशी जनतेत मागणी होत आहे.दोन रोहित्र्याच्या बाजुस घनकचरा जमा होत असल्याने शहरातील मोकाट जनावरे या कचऱ्यात टाकलेले अन्न व पालेभाज्या खान्यासाठी जमा होतात त्यातच विज वितरण कंपणीचे कर्मचारी( कटाउट बॉक्स) फेज पेटी बंद न करता हमेशासाठी उघडीच ठेवतात त्यामुळे मोकाट जनावरास विजेचा शॉक लागून दगवण्याची दाट शक्यता आहे. विद्युत वितरण कंपणीनीने ही फेज बॉक्स ‘बंद करून त्यास कुलुप लावून मुक्या प्राण्यांच्या जिवीत्वास होणारा धोका टाळावा अशी जनतेची मागणी आहे.


0
कृपया वोट करा

MKM मराठी न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!