१८ मे ला भिमेश भारती आणि निशाताई धोंगडे यांचा भिम व बुद्ध गितांचा जंगी मुकाबला


१८ मे ला निशाताई धोंगडे आणि भीमेश भारती यांच्यात स्वरांचा जंगी मुकाबला

महागाव शहरात भीमगर्जना घुमणार

मायाताई सागर पाईकराव.
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

यवतमाळ :- तथागत गौतम बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त महागावच्या मातीत प्रबोधनाचा नवा इतिहास रचल्या जाणार आहे. सोमवार १८ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ ते १० पर्यंत महागाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात समता, बंधता व शिक्षा विषयी प्रबोधन आणि गायकांच्या स्वरांचा ‘जंगी मुकाबला’ आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यासाठी यवतमाळ जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांतील भीम अनुयायांचा जनसागर उसळण्याचे चित्र होत असलेल्या प्रचारातून दिसून येत आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात महाराष्ट्राची बुलंद तोफ प्रख्यात गायिका निशाताई धोंगडे (चंद्रपूर) आणि महाराष्ट्रातील विदर्भाचे लाडके सुप्रसिद्ध गायक भीमेश भारती (नागपूर) यांच्यात स्वरातून भीम व बुद्ध गीताच्या जुगलबंदीचा थरार पाहायला मिळणार आहे.आपल्या पहाडी आवाजात भीमगीते आणि प्रबोधनपर गीतांनी जनमानसात चैतन्य निर्माण करण्यासाठी हे दोन्ही दिग्गज कलाकार सज्ज झाले आहेत. समता आणि बंधुता व शिक्षण यावर डॉक्टर प्राध्यापक अनिल काळबांडे सर व जयश्रीताई संजय नरवाडे शिक्षिका महागाव यांचा सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम आयेजित केला असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.साहेबरावजी कांबळे (सरचिटणीस, सं. गांधी पं. राज महाराष्ट्र) राहणार आहेत.तर प्रमुख अतिथी म्हणून प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर अभय मस्के तहसीलदार महागाव,मायाताई ठोके नायब तहसीलदार पुसद, रंजनाताई दीपक आडे नगराध्यक्ष महागाव, नालंदा भरणे नगराध्यक्ष आर्णी, धनराज निळे पोलीस निरीक्षक महागाव,डि के मुनेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी महागाव, एस ए मेश्राम वनपरिक्षेत्र अधिकारी काळी दौलत, डॉक्टर बी डी चव्हाण नांदेड, एडवोकेट डी एस हरदडकर, डॉक्टर संदीप गायकवाड, मिलिंद रामटेके,महेंद्र कावळे सर, रामराव गायकवाड, मिलिंद चिकाटे, डॉ. नीरज वाघमारे नगरसेवक यवतमाळ, सुनंदाताई दिलीप कोपरकर माजी नगराध्यक्ष महागाव,यांच्यासह पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक सागरदादा पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य तयारी करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे आयोजक प्रविण कावळे आणि अध्यक्ष अमोल राजवाडे यांच्या देखरेखीखाली कार्यकर्ते अहोरात्र राबत आहेत. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी रवि वाघमारे (निमंत्रक), युवा संघटक प्रशिक पाईकराव, परिश्रम घेत आहेत. केवळ करमणूक नव्हे तर तथागत गौतम बुद्धाचेआणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मौल्यवान विचार सामान्यांपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. महागाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य प्रांगणात महिला तरुण आणि अबालवृद्धांसाठी बसण्याची सुसज्ज व्यवस्था करण्यात येणार आहे. या प्रबोधनाच्या सोहळ्यात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


0
कृपया वोट करा

MKM मराठी न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!