मु.सं.सागर पाईकराव
महागांव हद्दीतील मौजा गुंज येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ५२ पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या इसमावर कारवाई करून ५५,९६० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.यवतमाळ जिल्ह्यात कोणात्याही प्रकारचे अवैध धंदे,अवैध शस्त्र,अवैध उत्खनन सुरु राहणार नाही. तसेच अवघड गुन्हे,आरोपी शोध,अवैध धंद्याचे समुळ उच्चाटण व्हावे याकरीता मा.पालीस अधिक्षक कुमार चिंता साहेब यांनी पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना अदेशीत केले होते.त्याच अनुशंगाने पोलीस निरिक्षक स्थानीक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्यांचे अधिस्थान पथकांना गोपनीय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.यावरून दिनांक १३/६/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागत अवघड गुन्हे,आरोपी शोध,कामी रवाना झाले.पोलीस स्टेशन महागांव हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहीतीदारा कडून माहीती मिळाली की,मौजे गुंज येथिल श्रीधर पुंजाराव जोरोळे यांच्या कॉम्पलेक्सच्या पाठीमागे मोकळ्या जागेत काही लोक गोलरिंगन करून ५२ पत्याचा जुगार खेळत आहेत.अशी माहीती मिळाल्याने नमुद पोलीस अधिकारी व पोलीस आमलदार असे दोन पंचासह मिळालेल्या माहीतीच्या प्रमाणे गुंज येथील श्रीधर पुंजाराव जोरोळे यांच्या कॉम्पलेक्सच्या पाठीमागे मोकळ्या जागेत सापळा कारवाई केली असता सदर ठिकाणी १)निरंज नागोराव यादव २) श्रीधर पुंजाराव जोरोळे ३)संतोष किसन राठोड ४) नागोराव विठ्ठल दुपारते ५)दिंगाबर दत्तात्रेय आसोले ६) राजेंद्र पुंडलीक कांबळे ७)सुशील भगवान आव्हाड सर्व रा. गुंज ता.महागांव असे पैस्याच्या हारजितवर ५२ पत्ते जुगार खेळ खेळत असतांना मिळून आल्याने त्याचे अंगझडती व डावातील तसेच मोबाईल असा एकुण ५५,९६० /- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून नमुद इसमाविरुद्ध पोलीस स्टेशन महागांव येथे कलम १२ अ मजुका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक यवतमाळ कुमार चिंता(भा.पो.से.)साहेब,मा.अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ अशोक थोरात (म.पो.से.) सा.तसेच मा.पोलीस निरिक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ,यांचे मागदर्शनात स.पो.नि.धिरज बांडे,पोउपनि/अमोल राठोड सफौ/ मुन्ना आडे,सफौ/ संतोष भोरगे,पोहवा/ तेजाब रणखांब,पोहवा/सुभाष जाधव,पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा/ रमेश राठोड,पोशि/ सुनिल पंडागळे,चापोउपनि/रविंद्र शिरामे,चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.









