जनुना शेतशिवारात गांजाची लागवड करणाऱ्या इसमावर गुन्हे शाखेची कारवाई. एकास अटक तर २४ हजाराचा मुद्देमाल जप्त.


जनुना शेतशिवारात गांजाची लागवड करणाऱ्या इसमावर गुन्हे शाखेची कारवाई.

एकास अटक तर २४ हजाराचा मुद्देमाल जप्त.

संपादक:-मायाताईसागर पाईकराव.

 

यवतमाळ जिल्ह्यात कोणात्याही प्रकारचे अवैध धंदे,अवैध शस्त्र,अवैध उत्खनन सुरु राहणार नाही.तसेच अवघड गुन्हे,आरोपी शोध,अवैध धंद्याचे समुळ उच्चटण व्हावे याकरीता मा.पोलीस अधिक्षक कुमार चिंता साहेब यांनी पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना अदेशीत केले होते.त्याच अनुशंगाने पोलीस निरिक्षक स्थानीक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्यांचे अधिस्थान पथकांना गोपनीय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.

दिनांक २४/९/ २०२६ रोजी स्थानीक गन्हे शाखा पथक यवतमाळ कँप पुसद यांना गुप्त बातमादारामार्फत माहीती मिळाली की पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण हद्दीतील मोजे-जनुना शेतशिवारात शेतात इसम नामे संतोष किसन लोहटे याने त्यांचे शेतात गांजा आमली पदार्थ झाडाची लागवड केली आहे.अशी माहीती मिळाल्याने संदर्भात प्राप्त माहीती वरून पथकाने तात्काळ वरिष्ठाना याबाबत अवगत करून मौजे जनुना शेतशिवारात जावुन पंचा समक्ष सापळा कारवाई केली असता जनुना गावच्या हद्दीत शेतशिवारात इसम नामे- संतोष किसन लोहटे हा त्यांचे ताब्यातील शेतात गांजा आमली पदार्थाचे एकुण २२ झाडे लावलेली मिळून आल्याने सदरची गांजा आमली पदार्थ झाडे एकुण किमत २४.००० रुपयाचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्तीसह इसम नामे-संतोष किसन लोहटे वय ३५ वर्ष रा.जनुना ता.पुसद जि. यवतमाळ यांच्या विरोधात पोलीस स्टेशन पुसद ग्रामिण येथे आमली पदार्थ व मनप्रभावी पदार्थ अधिनियम १८९५ चे कलम ८(ब)२०(a),(i) अन्वये गुन्हा नोंदीसह कारवाई करण्यात आली आहे.

स्थानीक गुन्हे शाखा यवतमाळ ही अवैध धंदे,शस्त्र बाळगणाऱ्या,गुन्हे उघड करणे तसेच गुंगीकारक औषधद्रव्य तस्करीचे उच्चटन करण्यास प्रतिबद्ध असून या पुढे या संबधी माहीती असल्यास सदरची माहीती जनतेने पोलीसाची कोणतीही भिती मनात न बाळगता पुरवावी व पोलीसांना सहकार्य करावे ही विनंती

सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक यवतमाळ कुमार चिंता(भा.पो.से.)साहेब,मा.अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ अशोक थोरात (म.पो.से.) सा.तसेच मा.पोलीस निरिक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ,यांचे मागदर्शनात स.पो.नि.धिरज बांडे,पोउपनि/अमोल राठोड सफौ/ मुन्ना आडे,सफौ/ संतोष भोरगे,पोहवा/ तेजाब रणखांब,पोहवा/सुभाष जाधव,पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा/ रमेश राठोड,पोशि/ सुनिल पंडागळे,चापोउपनि/रविंद्र शिरामे,चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.


7
कृपया वोट करा

MKM मराठी न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!