संपादक :- मायाताई सागर पाईकराव
दिनांक 30 एप्रिल 2026 रोज बुधवार ला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून वंचित असलेल्या महिलांचा जनता दरबार तालुका काँग्रेस कमिटी कार्यालय महागाव येथे घेण्यात आला या कार्यक्रमांमध्ये महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष वंदनाताई आवारि, नीलिमा काळे ताई, महिंद्रजी कावळे सर जिल्हाध्यक्ष ( अनु.जाती ), तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील भाऊ राठोड, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष इम्रान पठाण, माजी नगराध्यक्ष सुनंदाताई कोपरकर, नगरसेविका सुरेखाताई कोपरकर, रूपालीताई कोलेकर नगरसेविका हे उपस्थित होते, या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सौ जयश्री संजय नरवाडे तालुकाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी महागाव, सौ सीमा नरवाडे शहराध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी महागाव, हसीना आगवान, दीक्षा धम्मानंद कावळे, सीमाताई जाधव,प्रशिक सागर पाईकराव इत्यादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहकार्य केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान पाटील राऊत यांनी केले, या कार्यक्रमास तालुक्यातील असंख्य महिलांनी सहभाग नोंदविला होता.




